Chandrakant Khaire on Amit Shah: शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी अमित शाहांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेवरुन चांगलाच समाचार घेतला. यावेळी गोध्रा हत्याकांडावेळी भाजपातून नरेंद्र मोदींना काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत होते, त्यावेळी बाळासाहेब मोदींसाठी कसे उभे राहिले याची आठवण करुन दिली. याचवेळी त्यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह आणि बंडखोर गुलाबराव पाटलांनाही खडेबोल सुनावले. औरंगाबादेत मीनाताई ठाकरेंच्या स्मृतिदिनी अभिवादन केल्यानंतर चंद्रकांत खैरे माध्यमांशी बोलत होते.